1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (15:01 IST)

तलवारींसोबत नवरदेवाचा डान्स, पोलिसांच्या भीतीने लग्नाच्या मुहूर्तावर फरार

Groom dance with swords in Latur
लातूर येथे  ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरदेव फरार झाला आहे. कारण पोलीस त्याच्या शोधात आहे. नवरदेव शुभम तुमकूटे यावर लग्नाच्या दिवशी पसार होण्याची वेळ आपल्या मित्रांमुळे आली आहे.
 
एलआयसी कॉलनीत हळदीच्या कार्यक्रमात काही युवक धिंगाणा घालत असून कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन डान्स करत होते. हळदी समारंभाच्या नावाखाली धिंगाणा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलीस आल्याच बघून धावपळ सुरु झाली.
 
तेव्हा तलवारी ताब्यात घेऊन पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातल्या पाच जणांना अटकही केली आहे. मात्र नवरदेव शुभम तुमकूटे हा फरार झाला आहे. लातूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.