1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (09:21 IST)

पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा

Hail warning in many districts including Pune
पुण्यासह अनेक जिल्ह्यामध्ये हवामान खात्यानं वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपीटचा इशारा दिला आहे.  राज्यातील सांगली, सातारा, अहमदनगर, अकोला, बीड, बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना वगळून राज्यात यलो अलर्ट जारी केले आहे. 

मुंबईत उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्यानं दिला असून हवामान कोरड राहणाची शक्यता आहे. मुंबई मध्ये तापमान 36 अंश सेल्सिअस असेल. 

मुंबईत आकाश निरभ्र राहील हवामान कोरड असेल. येत्या आठवड्यात नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. 
पुण्यात हवामान स्थिर असून पाऊस आणि गारपिटीमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे 
 
कोकणात हवामान दमट आणि उष्ण राहील कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे 
 कोकणातील काही भागात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
 
Edited By- Priya Dixit