सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जुलै 2023 (16:33 IST)

Harshvardhan Jadhav Hospitalised हर्षवर्धन जाधव यांना हार्ट अटॅक

Harshwardhan Jadhav
Harshvardhan Jadhav News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी हर्षवर्धन जाधव हे आज कामानिमित्त गेले होते. मात्र, तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.