शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (15:13 IST)

पुढील 3 दिवस कडक उन्हाचे असून 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला

हवामान खात्याने इशारा दिला आहे की उष्णतेच्या लाटेसंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून हवामान विभागाने 12 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव तर नागपूर, चंद्रपूर, अकोला, भंडारा या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेची लाट वाढली आहे. मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेचा चटका वाढणार आहे.
 
 दक्षिणेकडील बहुतांश भागांसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.