शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (11:30 IST)

देशात 15 राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अलर्ट

देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागानुसार आज दिल्ली-एनसीआर मध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर यूपी-बिहार, झारखंड, महाराष्ट्र सोबत 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. 
 
14 ऑगस्ट पर्यंत उत्तराखंड आणि राजस्थान मध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये देखील 10 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
मुसळधार पावसामुळे उत्तराखंड, हिमाचल सोबत अनेक राज्यांमध्ये लँडस्लाइडच्या घटना घडत आहे. 
 
या राज्यांमध्ये कोसळू शकतो मुसळधार पाऊस-
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किम, ओडिशा, नागालँड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 
पर्वतीय राज्यांमध्ये 10 आणि 11 ऑगस्टला जम्मू आणि काश्मीरमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या शिवाय 14 ऑगस्ट पर्यंत उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये  मुसळधार पाऊस कोसळू शकतो. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये 10 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस सांगितलं आहे.
 
हवामान विभागानुसार आज आसाम आणि मेघालयच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, 14 ऑगस्ट पर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपुर, मिजोरम आणि त्रिपुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.