शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 21 जुलै 2021 (10:12 IST)

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच

सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाने धुमाकूळ घातला आहे.महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ठाण्यात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे अनेक भागात घरात पाणी शिरल्यामुळे लोकांची तारांबळ झाली आहे.नदीवर पाण्याचे पूर वाहत असतानाची दृश्ये बघायला मिळत आहे.
 
मुंबईत तलावात पाण्याची पातळी वाढली आहे.मुंबईतील अनेक विहार ओसंडून वाहत आहे.कल्याण मध्ये आता पर्यंत 368 मिमी,भिवंडी येथे 300 मिमी, अंबरनाथ 253 मिमी,ठाण्यात 159 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.
मराठवाड्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.
 
कोकणात देखील पाऊसाचा जोर सुरूच आहे.पुणे,सातारा,कोल्हापूर,रत्नागिरी, रायगड या पाच जिल्ह्यांना 21 जुलै व 22 जुलै रोजी रेड अर्लट देण्यात आला आहे.तर, मुंबईलाऑरेंज अर्लट दिला आहे.
 
मुंबई-ठाण्यात 21 जुलैला,तर रत्नागिरी,सिंधुदुर्गजिल्ह्य़ांत काही ठिकाणी 21,22 जुलैला अति मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे. 
 
तसेच,पुणे,कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांतील घाट क्षेत्रातही याच कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.याशिवाय,उत्तर महाराष्ट्रात हलका,तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता देखील सांगण्यात आली आहे.