शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (17:23 IST)

पुण्यात सैराट, तो गोळीबार कटाचाच भाग

पुण्यातल्या चांदणी चौकात बुधवारी चारजणांनी तुषार पिसाळ या तरूणावर गोळीबार केला. हा हल्ला आंतरजातीय विवाहाच्या वादातून झाला आहे. याप्रकरणी जखमी तरूणाने हिंजवडी पोलिसांना जबाब देत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तरुणाच्या चुलत सासऱ्यावर आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुलत सासरे राजू तावरे, सख्खे मेहुणे आकाश तावरे आणि सागर तावरे, मित्र सागर पालवे अशी गोळीबार करणाऱ्यांची नावं आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तुषार पिसाळ याचा आंतरजातीय विवाह त्याचे चुलत सासरे राजू तावरे यांच्या पुतणीशी झाला. याच रागातून त्याच्या पत्नीचे काका राजू तावरे आणि त्याच्या पत्नीचे सख्खे भाऊ आकाश आणि सागर यांनी तुषारवर गोळीबार केला. या सगळ्यांनी मिळून तुषार या तरूणाला ठार करण्याचा कट रचला होता. या कटात या तिघांना सागर पालवेनेही मदत केली.