मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2022 (07:30 IST)

पाचशे रुपयांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Humiliation of a minor girl by showing the lure of five hundred rupees
नाशिक शहरात अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिच्या घरात बळजबरीने घुसून तिला पाचशे रुपयांचे आमिष देत तिचा विनयभंग करणाऱ्या संशयिताच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोअं‌तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गेश दिलीप गवळी (रा. मखमलाबाद नाका) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी घरात एकटी असताना संशयित गवळीने घरात प्रवेश करत घराचे दरवाजाची कडी आतून लावून घेतली.
 
पीडित मुलीला बळजबरीने जवळ बसवत मी तुला पाचशे रुपये देतो, असे सांगत विनयभंग केला. याबाबत कुणास काही सांगितले तर पुन्हा घरात येऊन तुला आणि तुझ्या घरच्यांना बघून घेईन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
 
दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलाच्या पायाला सूज आल्याने त्याच्या पायाला मलम लावण्यासाठी घरात बोलावत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित महेंद्र गोविंद पंडित (रा. दाभाडी, मालेगाव) याच्या विरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, लहान भावाच्या पायाला सूज आली असल्याने त्यावर उपचाराकरिता मलम देतो असे सांगत लहान भाऊ यास संशयित महेंद्र पंडितने घरात बोलवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.