1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:44 IST)

मला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती : शशिकांत शिंदे

I was offered to join the party by BJP: Shashikant Shinde
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. यात मलाही ऑफर देण्यात आली होती, असा दावा करत शिंदे यांनी केला  आहे. शिंदे साताऱ्यात बोलत होते.
 
शिंदे म्हणाले,”तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. त्याचबरोबर तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाकडून १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असंही मला सांगण्यात आले होतं, असा दावा आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले,”त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहिन. उदयनराजे हे भाजपात जात असतानाही मला ऑफर आली होती,” असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.