बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (07:22 IST)

दिवाळीत थंडी नाही तर पाऊस, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण पट्टा निर्माण झाला असून या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात सद्या पाऊस सुरु आहे. त्याच प्रमाणे बंगालच्या उपसागरात हि अशाच प्रकारचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्या मुळे ३० ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे ही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दिवाळीत महाराष्ट्रावर आसमानी संकट येणार असल्याची शक्यता दिसून येते आहे.  
 
बंगालच्या उपसागरात अजुन एक कमी दाबाचा पट्टा  तयार झाले आहे. या दोन्ही पट्ट्यामुळे संयुक्त होण्यामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा चक्री वादळ  अरबी समुद्रात निघुन जाण्याऐवजी आता किनारपट्टी कडे सरकत आहे. असे झाल्यास २४, २५ ला कर्नाटक आणि २५,२६,२७ ला महाराष्ट्रात किनारपट्टी व घाटमाथ्यावर तुफान पाऊस होणार आहे. एकुणच उभ्या भात शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे 
 
या कालावधीत पावसामुळे अनॆक भागात नद्यांना मोठे पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशाखापट्टणम जवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील  रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,नाशिक, पुणे ,मुंबई या ठिकाणी येत्या काही दिवसात  मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.