1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:39 IST)

हॉटेलमध्ये रुम हवी तर 'हा' वैदयकीय अहवाल द्या, हॉटेल चालकांचा निर्णय

room
सध्या महाराष्ट्र आणि त्याच्या जिल्ह्ययात कोरोना वाढतो आहे. आता अनेक शहरातील निवासी हॉटेलात आता करोनाचे रुग्ण खोल्या करून राहत असल्याची धक्कादायक बाब समोर येते आहे. हे रुग्ण निवासी हॉटेलात खोली नोंदणी करताना आणि आम्ही करोनाबाधित नाही असे सांगत तेथेच १४ दिवस विलगीकरणात राहत आहेत. असे प्रकार उपराजधानी नागपूर येथे उघड झाला आहेत. हे कोरोना रुग्ण निवासी हॉटेल व्यावसायिकांना अंधारात ठेवत असल्याने हॉटेल व्यावसायिक ग्राहकांना खोली हवी असल्यास करोना चाचणी अहवाल दाखवण्याची मागणी सुरु केली आहे. 
 
विशेष म्हणजे नागपुरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णांसाठी रुग्णालयात अथवा विलगीकरण केंद्रात जागा अपुरी पडत असल्याने त्यांना गृहविलगीकरण ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र अनेकांची घरे छोटी असून त्यांच्यापासून घरातील इतर मंडळींना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बाधित रुग्णांनी आता खासगी हॉटेलकडे आपला मोर्चा वळवला आहे. टाळेबंदीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून निवासी हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे हॉटेल चालक अधिक अडचणीत सापडले आहेत. 
 
मात्र आता गेल्या महिन्यात काही प्रमाणात निवासी हॉटेल सुरू करण्यास शिथिलता मिळाली आहे. त्यामुळे सध्या तरी नागपूर येथील नागपूर रेसिडेंटल हॉटेलस् असोसिएशनने निर्णय घेतला आहे. यानुसार निवासी हॉटेलात येणारा ग्राहक कोरोना सकारात्मक आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी आम्ही ग्राहकांना कोरोना चाचणी अहवाल मागत आहोत अशी माहिती अध्यक्ष जिंदरसिंग रेणू, यांनी दिला आहे.