रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (10:52 IST)

गणेशोत्सवासाठी राज्यात स्थानिक निर्बंध लागू करा, केंद्राची राज्य सरकारला सूचना

Implement local restrictions in the state for Ganeshotsav
आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी राज्यात स्थानिक निर्बंध लागू करा अशी सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना पत्राद्वारे ही सूचना केली आहे.
 
राज्यात पॉझिटिव्हिटी रेट आणि काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने याबाबत खबरदारी घेण्यास सांगितलं आहे, तर उत्सवादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी शक्यता आयसीएमआरने वर्तवली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना गर्दी करु नका असे आवाहन केलं आहे.नागरिकांचा जीव अधिक महत्त्वाचा असून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी यासाठी सहकार्य करावे असंही ते म्हणाले आहेत.
 
राज्य सरकारने यंदाही दहीहंडीच्या सार्वजनिक उत्सवाला परवानगी दिलेली नाही. तर सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतही राज्य सरकार कडक निर्बंध जारी करणार आहे.