गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (18:01 IST)

चंद्रपुरात पुराच्या पाण्यात बस अडकली , सर्व प्रवाशांना सुखरूप वाचविण्यात स्थानिकांना यश

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर सुरु आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाल्यात पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूर आले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. चंद्रपुरात पुराच्या पाण्यात बस अडकल्याचे  वृत्त मिळाले आहे. या बस मध्ये एकूण 35 प्रवाशी असून ही बस मध्यप्रदेशातून निघाली असून चंद्रपूरातून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे  शॉर्टकट घेत हैदराबाद चालली होती.पोलिसांनी पुढे मार्ग बंद असल्याचे सांगितल्यावर देखील बस चालकाने बस पुढे नेली आणि  चिंचोली नाला येथे ही बस पुराच्या पाण्यात अडकली आणि बंद पडली. या मुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. 

पुराच्या पाण्यात प्रवाशी बस अडकल्याची माहिती मिळतातच विरूर पोलीस ठाण्याचे पथकाने अंधारातच बचाव कार्ये सुरु केली आणि स्थानिकांच्या मदतीने दोऱ्या बांधून वृद्ध, लहानमुले, महिला प्रवाशींना बाहेर काढण्यात यश मिळवले आणि सर्वाना दुसऱ्या बसने हैदराबाद साठी रवाना केले.