गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (11:59 IST)

गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमात धिंगाणा , प्रेक्षक स्टेजवर चढले

Gautami Patil's dance program
प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील यांच्या डान्स कार्यक्रमात बीड येथे प्रेक्षक चक्क स्टेजवर चढून धिंगाणा केल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या अवघ्या महाराष्ट्रात लावणी डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे. त्याचे कारण असे की गौतमी पाटील यांच्यावर लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करण्यावरून टीका केली आहे. 
बीडच्या राजुरी शिवारात वाढदिवसाच्या समारंभात गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असता त्यांच्या डान्स पाहणाऱ्यांची तुफान गर्दी झाली. गौतमीने डान्स सुरु केला असता शेकडो प्रेक्षकांनी स्टेजवर चढून धिंगाणा केला. या वेळी स्टेजवर दगडफेक केली.या सर्व गोंधळात गौतमी पाटील या सुरक्षित आहे.

मात्र कार्यक्रमाला आयोजकांना बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. गौतमीला बघण्यासाठी प्रेक्षक स्टेजवर चढल्याचे सांगण्यात आले. सध्या ग्राम पंचायत निवडणुकीची आचारसंहिता सर्वत्र लागू आहे. तरीही हा कार्यक्रम कसा आयोजित केला गेला. हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Edited By- Priya Dixit