मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (23:03 IST)

रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेले तिघे बुडाले

रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्जत जवळील डिकसळ येथे ही घटना घडली. कुर्ला येथून हे तिघे पाली भूतवली धरणावर पोहण्यासाठी आले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. मृतांमध्ये साहील हिरालाल त्रिभुके (वय- १५ वर्षे), प्रीतम गौतम साहू ( वय -१२ वर्षे), मोहन साहू (वय -१६ वर्षे) या तिघांचा समावेश असून, हे तिघेही कुर्ला नौपाडा, नानीबाई चाळ येथील आहेत.