1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (10:21 IST)

रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपती मंडपात चक्क डान्स गर्लला नाचलवल्या

In the Ganapati mandap
नंदुरबारच्या रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेल्या गणपती मंडपात शुक्रवारी गणेश मंडळातर्फे आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. अचानक या आर्केस्ट्रामध्ये काही डान्सगर्ल विचित्र गाण्यांवर चुकीच्या पद्दतीने थिरकू लागल्या. लोको पायलटांनी लोकलॉबीमध्ये बसवलेल्या गणपती मंडळात हा सारा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपती मंडपात चक्क डान्स गर्लला नाचलवल्याचा अश्लील प्रकार उघडीस आला आहे. नंदुरबारच्या रेल्वे स्थानकात बसवण्यात आलेल्या गणपती मंडपात शुक्रवारी गणेश मंडळातर्फे आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. अचानक या आर्केस्ट्रामध्ये काही डान्सगर्ल विचित्र गाण्यांवर अश्लील पद्दतीने नाचू लागल्या. या वेळी काही कर्मचारीदेखील त्यांना प्रतिसाद देत नाचू लागल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात लोको पायलट विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र सुरू असलेल्या प्रकारावर कोणीच आक्षेप घेतला नाही. हा सारा प्रकार लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे पोलिस बलाच्या पोलिस ठाण्यांपासुन हाकेच्या अंतरावर झाला असतांना याबाबत त्यांच्याकडुनही कुठलीही कारवाई झाली नाही. शुक्रवारी रात्री झालेल्या या प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या साऱ्या प्रकाराबाबत टीका होत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाचे अधिकारी किंवा कोणीही बोलण्यास तयार नाही.