सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (22:23 IST)

नात्याला काळिमा फासणारी घटना ; जळगावात अल्पवयीन भाचीवर मामा अत्याचार

Incidents that tarnish
जळगावात मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नराधम मामाने चाकूचा धाक दाखवत १६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मामाला बेड्या ठोकल्या आहे.
 
याबाबत असे की, पिडीत मुलगी ही मध्यप्रदेशातील रहिवाशी असून जळगावात नातेवाईकांसोबत मिळेल ते काम करते. दरम्यान, आठ दिवसांपुर्वी मामाने भाची असलेल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर तुला जीवे ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ व मारहाण केली.
 
दरम्यान, याबाबत पिडीत मुलीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला तालुका पोलीसात रात्री अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार पुढील तपास करीत आहे.