गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (15:55 IST)

महिला दिनाच्या शुभेच्छा देताना ठाकरे सरकारवर निशाणा

/international
मनसेने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मनसेचे घाटकोपर विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’.. सरकारची ही टॅगलाईन महिला सुरक्षेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. तुमच्या घरातील स्त्री ही तुमचीच जबाबदारी आहे भावांनो. सरकारच्या भरोशावर राहू नका असं म्हणत गणेश चुक्कल यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 
गणेश चुक्कल यांनी ट्विट करत महिला दिनाच्या शुभेच्छा देताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’.. सरकारची ही टॅगलाईन महिला सुरक्षेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. तुमच्या घरातील स्त्री ही तुमचीच जबाबदारी आहे भावांनो. पुजा चव्हाण, शर्मा भगिणी आणि कोविड सेंटरमधील महिलांचं काय झालं माहितीये ना? सरकारच्या भरोशावर राहू नका, याच महिला दिनाच्या शुभेच्छा,” असं ट्विट गणेश चुक्कल यांनी केलं आहे.