शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 10 जून 2021 (08:11 IST)

मद्याच्या नशेत स्वतःला पेटवून घेतले, उपचारा अगोदरच मृत्यू

मद्याच्या नशेत अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलेल्या युवकाचा १०० टक्के भाजून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी फुलेनगर झोपडपट्टी येथे घडली. लक्ष्मण साकरून दोंदे (३८, रा. भराडवाडी, फुलेनगर) असे पेटवून घेणार्‍याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोंदे याने मद्याच्या नशेत फुलेनगरच्या तीन पुतळा परिसरात ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत स्वतला पेटवून घेतले. यामध्ये तो १०० टक्के भाजला. पोलीसांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
….
५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना
नाशिकः राहत्या घरी छतास दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सुभाषरोड परिसरात मंगळवारी (दि.८) दुपारी घडली. संजय नामदेव खैरनार (५५, रा. सुभाषरोड, पवारवाडी, नाशिकरोड) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसर खैरनार यांनी घरात कोणी नसताना मंगळवारी दुपारी छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांना जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. पंरतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.