मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (21:27 IST)

पाकिस्तानी महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही

amay khopkar
माहिरा खान आणि हमजा अली अब्बासी यांसारख्या पाकिस्तानातील बड्या स्टार्सनी अभिनय केलेल्या 'द लीजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने पाकिस्तानी चलनानुसार १० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २०० कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाची क्रेझ पाकिस्तानातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेता फवाद खानचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे. 
 
पाकिस्तानी चित्रपटावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पावित्रा घेतला असून खळखट्याकचा इशारा दिला आहे. "पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही" असं म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "तुम्ही मेहनतीने जी इमारत उभी केलीत, त्याची तोडफोड होईल असं कृत्य करू नका" असं म्हणत थिएटरमालकांना आवाहन केलं आहे.
 
अमेय खोपकर यांनी "पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही" असं म्हटलं आहे. तसेच "थिएटरमालकांना नम्र आवाहन - मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor