शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (15:31 IST)

पोलिसानेच अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला

rape
सातारा ते कोल्हापूर एसटी प्रवासादरम्यान एका पोलिसानेच अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. याबाबतच्या तक्रारीनंतर संबंधित पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महाविद्यालयीन युवतीसोबत आश्लिल चाळे केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला आहे.
 
सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. दरम्यान याबाबत संबंधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली. कराड एसटी स्टॅण्डवर बस पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांना सोबत घेऊनच तिथे हजर झाले आणि छेड काढणाऱ्याला ताब्यात घेतले. 48 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा संपवून कोल्हापूरला जात असताना आरोपी मगदूम यांनी अल्पवयीन मुलीसोबत हे कृत्य केले.
Edited By- Ratnadeep Ranshoor