शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जानेवारी 2022 (17:27 IST)

अपघातात जवान बाबा करांडे यांचे निधन

रविवारी सकाळी कार आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक होऊन झालेल्या अपघातात कामावरून घरी परत जात असलेलले रेल्वे सुरक्षा दलातील जवान बाबा कारंडे यांचे अपघाती निधन झाले. 
हा अपघात दौंड ते काष्टी दरम्यान रविवारी पहाटे झाला. उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यांची कार ट्रॉलीला जाऊन धडकली आणि त्यांचा अपघातात मृत्यू झाला. ते कामावरून कारने आपल्या गावाकडे निघाले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळतातच दौंडमधील त्यांच्या सहकार्यांनी त्यांना वाचविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली  पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.