शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू, मंत्रालयात जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही
शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसेच स्लीपर्सच्या न वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.
महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.