मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (15:45 IST)

जितेंद्र आव्हाड यांचा भाजपा नेत्यांना टोला

Jitendra Awhad
ब्रुक फार्मा कंपनीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपा नेत्यांमध्ये वादविवाद सुरू आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावला असून, एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहन केलं आहे.
 
“ब्रुक फार्मा या कंपनीचं साठेबाजी करणं आणि औषधी काळ्या बाजारात विकणं त्यांचा धंदा जोरात आहे. गुजरातमध्येच त्यांच्यावर केस झाली आहे. महाराष्ट्राला आता सगळ्या राजकारण्यांनी एक व्हावं याची गरज आहे. हे लहान पोरांसारख माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस. रागाच्या भरात चूक झाली असेल…,” असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावला आहे.