1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जुलै 2020 (09:31 IST)

जितेंद्र आव्हाड प्लाझ्मा दान करणार

काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. उपचारानंतर आव्हाडांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, दोन महिन्यांती त्यांनी आपली रक्त चाचणी केली. दरम्यान, रक्त चाचणीचे अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
“मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातून मी बराही झालो. मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे. येत्या दोन दिवसात मी रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार आहे,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.