सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (15:47 IST)

खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता, अमृतपाल सिंग आहे तरी कोण एक रिपोर्ट

खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता , मग आता आपण जाणून घेवू खलिस्तानी अमृतपाल सिंग आहे तरी कोण एक रिपोर्ट
 
मुंबई : पंजाबमधून बेपत्ता  झालेला खलिस्तानी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणार्‍यांवर पोलिसांची कडक नजर ठेवण्यात येत आहे. अमृतपाल सिंग फरार असून पंजाब पोलीस त्याच्या मागावर आहे.
 
नांदेड शहरात पंजाबमधून येणार्‍यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी पंजाबमध्ये काही खलिस्तानी अतिरेकी पकडले गेले होते. त्यामुळे अमृतपाल आणि त्याचे समर्थक नांदेडला येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अलर्ट राहीर करण्यात आला आहे. बाहेरून जे लोक नांदेडमध्ये येतात त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेऊन आहेत.पंजाब पोलीस शनिवारपासून अमृतपालचा शोध घेत आहेत. मात्र तो पोलिसांना चकवा देत आहे. हे प्रकरण आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोहोचले आहे. अमृतपाल पळून गेल्याबद्दल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले आहे.
 
कोण आहे अमृतपाल सिंग?
अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावात राहणारा अमृतपाल सिंग 2012 मध्ये कामासाठी दुबईला गेला होता आणि तेथून नुकताच भारतात परतला. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र, त्याने खलिस्तान, भिंद्रनवाले आणि त्यासंबंधीचे सर्व ज्ञान इंटरनेटमुळे मिळवले. दुबईत राहून तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. त्याचवेळी, भारतात परतल्यानंतर तो आता खलिस्तानी समर्थक दीप सिद्धूच्या 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख आहे. दीप सिद्धूचा नुकताच रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धूलाही शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार धरण्यात आले होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी चळवळ चालवणारा जर्नेल सिंग हा भिंद्रनवालेचा समर्थक आहे. स्वयंघोषित खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग वेगळ्या शीख राज्याच्या मागणीसोबतच प्रक्षोभक विधाने करतो. अशा चर्चा अमृतपाल यांच्याबाबत होत आहेत अमृतपाल सिंग यांच्याबाबत पंजाबमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अमृतपाल सिंगला काही दुष्ट खलिस्तानींनी प्रशिक्षण दिल्याचा दावा काही लोक करतात, तर काही लोक म्हणतात की अमृतपाल सिंग यांच्यामागे आयएसआय किंवा इतर कोणतीही सीमापार संघटना आहे. त्याचबरोबर अशीही चर्चा सुरू आहे की, अमृतपाल सिंग यांना येत्या निवडणुकीत वापरण्यासाठी आणले आहे का? अमृतपाल हा भिंद्रनवालेचा अनुयायी असल्याचा दावा करतो अमृतपाल सिंग हा स्वत:ला खलिस्तानी दहशतवादी जनरेल सिंग भिंद्रनवालेचा अनुयायी असल्याचा दावा करतो. संघटनेच्या प्रमुखाच्या राज्याभिषेकावर अमृतपाल सिंह म्हणाले होते, भिंद्रनवाले हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालेन. मला त्याच्यासारखे व्हायचे आहे, कारण प्रत्येक शीखला हेच हवे आहे, परंतु मी त्याचे अनुकरण करत नाही. त्याच्या पायाच्या धुळीच्या बरोबरीनेही मी नाही. ते पुढे म्हणाले, मला धर्मस्वातंत्र्य हवे आहे. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब याला समर्पित आहे. पूर्वी या गावातून आमचे युद्ध सुरू व्हायचे. भविष्यातील युद्धही याच गावातून सुरू होणार आहे. आपण सर्व अजूनही गुलाम आहोत. आपल्याला आपल्या स्वातंत्र्यासाठी लढावे लागेल. आमचे पाणी लुटले जात आहे. आमच्या गुरूंचा अपमान होत आहे. पंजाबमधील प्रत्येक तरुणाने पंथासाठी प्राण देण्यास तयार असले पाहिजे.
पोलिस व गुप्तहेर यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे की, अमृतपालला 158 परदेशी खात्यांतून फंडिंग सुरू होती. त्यातील 28 खात्यांद्वारे त्याला 5 कोटींहून अधिकची रक्कम पाठवण्यात आली होती. या खात्यांचा संबंध पंजाबच्या माझा व मालवाशी आहे. अमृतसर, तरणतारन, बगटाला, गुरुदासपूर, जालंधर, नवांशहर, कपूरथला व फगवाडा येथील खात्यांचाही अमृतपालशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
परदेशी फंडिंगप्रकरणी तपास यंत्रणांचा या मुद्यांवर फोकस...
1. देशात उघडलेल्या खात्यांच्या कागदपत्रांची छाननी.
 
2.  खाते कधी उघडले, पहिला व्यवहार कधी झाला, परदेशातून पैसे कधी आले.
 
3. पैसा कोणत्या देशातून आला? पैसे आल्यावर पुढील व्यवहार कुठे झाला?
 
4. कोणाच्या नावाने खाती उघडली गेली. अमृतपाल स्वतः किंवा त्याचा एखादा सदस्य खाते हाताळत होता का?
 
5. वारिस पंजाब दे व आनंदपूर खालसा फोर्सच्या सदस्यांच्या मालमत्तेचीही चौकशी केली जाईल.
दुचाकीपासून तयार करण्यात आलेल्या तीनचाकीवळून पळून जाताना अमृतपाल.
 
अमृतालचे बुधवारी एक छायाचित्र समोर आले. त्यात तो शाहकोटच्या एका रस्त्यावर दिसाल. पोलिस त्याच्यापासून फार दूर नव्हते. शाहकोटमध्ये पोलिस पाठलाग करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. पोलिसांनी 2 वाहने जप्त केली असून, 7 जणांना अटक केली आहे. त्यापासून थोड्याच अंतरावर अमृतपाल मर्सिडीजमधून उतरून एका गल्लीत शिरताना दिसत आहे.
याशिवाय त्याचा अन्य एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात अमृतपाल एका तीनचाकीवर बसलेला दिसत आहे. हे छायाचित्र जालंधरच्या नांगल अंबिया गावाचे आहे. तेथून तो आपली ब्रेझा कार सोडून मोटारसायकलवरून पळून गेला होता. शाहकोटपासून 42 किमी अंतरावर असलेल्या फिल्लौर-नूर महल रस्त्यावरील कालव्याच्या काठावर बुधवारी ही मोटरसायकल सापडली. त्यानंतर अमृतपालचा हा तीनचाकीवरील फोटो व्हायरल झाला.
 
अमृतपालचा विश्वासू तुफान 6 दिवसांपासून बेपत्ता
अमृतपालचा निकटवर्तीय व वारस पंजाब देचा जिल्हा प्रमुख लवप्रीत सिंग उर्फ तुफान सिंग जवळपास 6 दिवसांपासून घरी परतला नाही. तो आजतागायत पोलिसांपासून फरार आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तो अजनाला घटनेपासून घरीच होता.
 
18 फेब्रुवारी रोजी अजनाला पोलिसांनी तुफान सिंगला तरुणाला ओलीस ठेवून मारहाण केल्याप्रकरी अटक केली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी अमृतपालने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अजनाला पोलिस ठाण्याला घेराव घालून त्याची सुटका केली होती.
 
पत्नीची चौकशी, किरणदीप बब्बर खालसाची सक्रीय सदस्य
 
एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्यासह पोलिसांचे एक पथक बुधवारी अमृतपालच्या घरी पोहोचले. त्यांनी जवळपास 40 मिनिटे टीम अमृतपालच्या घरी डेरा टाकला. यासंबंधीच्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्या आईची चौकशी केली. यावेळी अमृतपालची पत्नी किरणदीपलाही प्रश्नोत्तरे करण्यात आली.
 
अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरचे बब्बर खालसा इंटरनॅशनलशी असलेले संबंध समोर आले आहेत. एवढेच नाही तर किरणदीप कौरला 2020 मध्ये बब्बर खालसासाठी पैसे गोळा केल्याप्रकरणी यूके पोलिसांनी अटकही केली होती.
 
अमृतपालने कपडे बदलले, पोलिसांनी त्याचे फोटो जारी केले
मंगळवारी अमृतपालचे एक छायाचित्र समोर आले. त्यात त्याचे कपडे बदलल्याचे निष्पन्न झाले. त्याने दाढी केली असून, पारंपारिक शीख बंडनाही काढला आहे. त्याच्या डोक्यावर गुलाबी पगडी दिसून येत आहे. ब्रेझा कार सोडण्यापूर्वी तो नांगल अंबिया गावातील गुरुद्वाराजवळ थांबला होता. तिथे त्याने गुरुद्वाराचे ग्रंथी रणजित सिंग व त्यांच्या कुटुंबीयांना तासभर बंधक बनवले. येथेच त्याने रूपही बदलले.


Edited By - Ratnadeep ranshoor