गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (16:01 IST)

Kolhapur : प्रियकरा सोबत मुलीच्या लग्नावरून केलं हे भयंकर कृत्य, गुन्हा दाखल

tantrik
आज जरी जग पुढे वाढले आहे तरी ही काही गावात आजही भोंदू बाबांच्या नाडी लागून अघोरी कृत्य करण्याचं काम सुरूच आहे. कोल्हापुरातील आजरा तालुक्यात असाच एक धक्कादायक  प्रकार घडला आहे. या गावात आपल्या मुलीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत होऊ नये या साठी  मुलीच्या आई-वडिलांनी भोंदू बाबाच्या नादी लागून जादू-टोण्या सारखे अघोरी कृत्य केले आहे. 

रेश्मा बुगडे आणि शामराव बुगडे असे या पालकांची नावे आहे. आपल्या मुलीचे गावात राहणाऱ्या राहुल पवारशी  प्रेम संबंध होते. दोघांच्या प्रेम संबंधाची माहिती त्यांच्या कुटुंबियांना होती. मात्र लग्नाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. मुलीशी लग्नाची मागणी करण्यासाठी  मुलाचे कुटुंब मुलीच्या घरी आल्यावर मुलीच्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिला. आधी काही काम शोध नंतर लग्नाचे बघता येईल. असं म्हणून लग्नाला नकार दिला. मुलीने प्रियकराशी लग्न करू नये या साठी मुलीचे पालक एका भोंदूबाबाच्या नादी लागून जादू टोणे करायला लागले. त्यांनी 29 सप्टेंबर रोजी रात्री स्मशानात जाऊन काही तरी पुरल्याचे राहुलच्या मित्राने राहुलला सांगितले. 

राहुल श्मशानात गेल्यावर त्या ठिकाणी स्वतःचा आणि तिच्या प्रेयसीचा फोटो बघून अवाक झाला. जादू टोण्याचे साहित्य देखील त्या ठिकाणी आढळले. 

त्या नंतर त्याला पुन्हा 28 ऑक्टोबरच्या रात्री काही अघोरी साहित्य आणि काळी बाहुली झाडावर लटकवलेली दिसली. हा सर्व प्रकार पाहून राहुलला धक्काच बसला त्याने त्वरित आजरा पोलिसात जाऊन मुलीच्या आई-वडील आणि भोंदू बाबासह चौघांची तक्रार करत गुन्हा नोंदवला. 
या प्रकरणी भोंदू बाबासह चौघांविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 
 



Edited by - Priya Dixit