Widgets Magazine
Widgets Magazine

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शैक्षणिक पात्रतेवर पुजारी नेमणूक

शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:28 IST)

kolhapur murti

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात परंपरेने पूजा करण्याऐवजी आता शैक्षणिक पात्रतेवर पुजारी नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर कायदा तयार करण्याचे काम सुरू असून येत्या तीन महिन्यांत तो करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली. 

अंबाबाई मंदिराबाबत जे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत, त्यावर येत्या पंधरा दिवसांत आमदारांसह सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कारभाराच्या सीआयडी चौकशीचा  अहवालही येत्या पंधरवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले. अंबाबाई देवीला पारंपरिक पोशाख डावलून घागरा-चोली नेसवल्याबद्दल भाविक व अंबाबाई मंदिरातील पुजारी यांच्यात झालेला संघर्ष तसेच शिर्डीच्या धर्तीवर पगारी पुजार्‍यांची नेमणूक करण्याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश क्षीरसागर व अन्य सदस्यांनी दिली होती.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शाहनवाज हुसेन यांचे अन्सारींच्या टीकेला उत्तर

देशातील मुस्लीम असुरक्षित असल्याचे मत व्यक्त करणारे भारताचे मावळते उपराष्ट्रपती हामीद ...

news

अन्सारींच्या मताशी भाजप नेते असहमत

देशातील मुस्लिम समाजामध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे, असे परखड विधान मावळते ...

news

आता चोवीस तास सुरू राहणार मुंबईतील दुकाने, हॉटेल्स!

मुंबईतील दुकाने, हॉटेल्स तसेच इतर आस्थापना चोवीस तास उघडी ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

news

वेंकय्या नायडू बनले उपराष्ट्रपती

नवी दिल्ली- राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता वेंकय्या नायडू यांना ...

Widgets Magazine