गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (12:16 IST)

एशियन पेंटच्या जाहिरातीवर आमदार ऋतुराज पाटील नाराज, जाहिरात हटवण्याची केली मागणी

kolhapur mla
एशियन पेंटच्या जाहिरातीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी नाराजी व्यक्त करून 'ती' जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. तसेच जाहिरात मागे घेऊन संपूर्ण कोल्हापूरकरांची माफी मागावी असे म्हटले आहे. सदरच्या जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिनवल्याचा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  
 
एशियन पेंटची ही जाहिरात १९ ऑगस्ट रोजी यू ट्यूबवर अपलोड करण्यात आली. आतापर्यंत ही जाहिरात १२ लाखाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. या जाहिरातीमध्ये एक लहान मुलगा आपल्या मित्रांना घरात केलेलं रंगकाम दाखवत असतो. यानंतर आपण सिंगापूरला फिरायला जाणार असल्याचं सांगतो. यावेळी तो मित्रांमध्ये भाव खात असतो. मात्र तेव्हाच त्याचे वडिल कामावरून येतात आणि त्याला आपल्याला कोल्हापूरला जायची तिकिट मिळाल्याचं सांगतात. यामुळे त्याचे वडिल त्याला चिडवायला लागतात.