शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (11:13 IST)

कोल्हापुरला महापुराचा धोका

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली असल्यामुळे पुरस्थिथी निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याहून कोल्हापूरकडे NDRF दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत. 
 
कोल्हापूर जिल्ह्यात ‍चार दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने सावधतेचा इशारा‍ दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून एनडीआरफएच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकार्यांनी सांगितले. 
 
कोल्हापूर जिल्ह्याच्या पशिचम भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस बरसत असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्याबची पाणी पातळी ही 34 फूट 6 इंच इतकी झाली आहे. हळू हळू पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू असल्यामुळे प्रशासन आत्ता अधिक सतर्क झालं आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे.