शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (17:51 IST)

तर कोकणवासी रेल्वे रोको आंदोलन करणार...

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारने 23 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नवीन अटी व नियम लागू केले आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात असून कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने विरोध दर्शवला आहे.
 
अटीप्रमाणे कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने विरोध दर्शवत म्हटले आहे की येत्या 5 सप्टेंबरपर्यंत सरकारने नियमात मुभा न दिल्यास 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करण्यात येईल.
 
गेल्यावर्षी देखील कोरोनामुळे गणेशोत्सव दरम्यान गणेशभक्तांना गावी जाता आले नव्हते. यंदा परिस्थिती सुधारलेली बघून अनेक लोकांनी तीन महिने आधीपासून रेल्वेचे आरक्षण केले. अशात आनंदात विरझण म्हणजे राज्य सरकारने 23 ऑगस्ट रोजी नवीन अटी व नियम असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. नियमांना प्रवासी संघाचा विरोध आहे.
 
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र आणि लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक अअसल्यामुळे चाकरमान्यांच्या मार्गातील हे अडथळे दूर करावे या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच 5 सप्टेंबरपर्यंत नियम शिथिल न केल्यास 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करु असा इशारा दिला आहे.