शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कोपर्डी बलात्कार प्रकरण, साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचे नाव

kopardi rape victim list
कोपर्डी बलात्कारप्रकरणी आता बचाव पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीला बोलावण्याची तयारी केली आहे. याबाबत बचावपक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचंही नाव घेतलं आहे.

विधानसभेत आणि एका वाहिन्याच्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. या अर्जावर 7 जुलैला सुनावणी होणार असून, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टात हजर राहायचं की नाही, याबाबतचा निर्णय होईल.
 
कोपर्डी बलात्कारप्रकरणी कोर्टात जबाब नोंदवणं सुरु आहे. यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमेने आपली साक्ष देताना सगळे आरोप नाकारले आहेत. त्यानंतर बचावपक्षाचे वकील प्रकाश अहेर यांनी साक्षीदारांची यादी कोर्टात सादर केली. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘सकाळ’चे संपादक श्रीराम पवार यांचा समावेश आहे.