1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (16:20 IST)

कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचे वक्तव्य मागे घ्यावे : उदयनराजे

Koshyari should withdraw his statement regarding Chhatrapati Shivaji Maharaj: Udayan Raje Marathi Regional News  In Webdunia Marathi
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावे असेही उदयनराजे म्हणाले आहेत. समर्थ रामदासांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल असे वक्तव्य राज्यपालांनी केले असून वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे शीवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला असून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच राजकीय नेत्यांकडूनही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यातयेत आहे.
 
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्यावर राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकिचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे.