शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (20:44 IST)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक - 2023

विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीच्या प्राथमिक मतदार याद्या जाहिर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण व अभ्यासमंडळावरील सदस्य निवडीकरीता निवडणूकीच्या अनुषंगाने ‘प्राथमिक मतदार’ याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्यानुसार विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळावरील सदस्य यांच्या निवडीकरीता प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते. त्याव्दारा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांतून विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची निवडणूक प्रक्रियेव्दारे निवड करण्यात येते. यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर मतदार याद्या विद्यापीठाचे www.muhs.ac.in   संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाकडून प्रसिध्द प्राथमिक मतदार यादीतील हरकती असल्यास दि. 03 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यापीठाकडे ई-मेलव्दारा अथवा विद्यापीठाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व लातूर येथील विभागीय केंद्रात लेखी स्वरुपात पुराव्याचे कागदपत्रांसह नोंदवू शकतात. याबाबत अधिक माहिती व सूचना विद्यापीठाचे निदेश क्र. 10/2017 मध्ये नमुद करण्यात आले आहेत. विहित वेळेत प्राप्त हरकतींवर मा. कुलगुरु यांचे समक्ष सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीचा निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यसात येईल. मा. कुलगुरु यांनी घेतलेला निर्णय अंतीम व बंधनकारक राहिल. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक वेळापत्रक व अंतीम मतदार याद्या मा. कुलगुरु महोदया यांच्या सुनवणीनंतर स्वतंत्र्यरित्या जाहिर करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठ निवडणूक कक्षास 0253-2539151 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor