मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (08:16 IST)

महाराष्ट्राला 4 दिवसांत ‘कोव्हिशिल्ड’ मिळण्याची शक्यता

देशात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केली. महाराष्ट्रासह काही राज्यांनी हे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली. येत्या चार दिवसांत काही राज्यांना कोव्हिशिल्डचा पुरवठा केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
 
महाराष्ट्रासाठी एकूण 12 कोटी लसींची मात्रा लागणार आहे. त्यानुसार, विविध राज्यांनी 34 कोटी लसींची मात्रा हवी असल्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडे केली आहे. त्यानुसार, येत्या 4 दिवसांत कोव्हिशिल्ड मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. लसींच्या पुरवठ्यासंदर्भात सीरम आणि बायोटेकलाही त्याची ऑर्डर देण्यात आली आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी त्यांना 2 कोटी लसींची मात्रा हवी असल्याचे कळविले आहे. सर्वात आधी कोरोना लसींचा पुरवठा हा महाराष्ट्राला आणि अन्य चार राज्यांना केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरीत राज्यांना पुरवठा करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
 
दरम्यान, कोव्हिशिल्ड या लसींचे दर जाहीर केले होते. मात्र, एकाच लसीचे तीन दर का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. सीरमची कोविशिल्ड ही लस आता 400 ऐवजी 300 रूपयांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.