शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (10:47 IST)

महाराष्ट्र 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी, सुप्रीम कोर्टाचे आदेश

महाराष्ट्र LIVE
महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले.
 
महत्त्वाचे पाच बिंदू
उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शपथ विधी
फ्लोर टेस्टमध्ये गुपित मतदान होणार नाही
शपथ विधीच्या नंतर लगेच फ्लोर टेस्ट
फ्लोर टेस्टचं लाइव्ह प्रसारण होणार
स्पीकरसाठी निवडणूक नाही
 
राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे. 
 
आता देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी फ्लोर टेस्टला सामोरा जायचे असून दुसरीकडं महाविकास आघाडीनं सत्तास्थापनेचा दावा केला असून, सोमवारी रात्री 162 आमदारांची परेड करत शक्तिप्रदर्शनं केलं.