बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

घ्या, या फसवणूकतही महाराष्ट्र अव्वल

एटीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक फसवणूक झाल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या एका सर्वेक्षणातून समोर आलीय. एटीएमद्वारे फसवणुकीत राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये एटीएम फसवणुकीची एकही घटना समोर आलेली नाही. 
 
महाराष्ट्रात एटीएम फसवणुकीचे २३३ गुन्हे दाखल झालेत. यांत ४.८१ कोटी रुपयांची फसवणूक झालीय. एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीत राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत एटीएम फसवणुकीच्या १७९ घटना समोर आल्या असून यांत २.९० कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तामिळनाडूत एटीएमद्वारे ३.६३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहेत.