गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जानेवारी 2024 (11:28 IST)

स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

महाराष्‍ट्रात सुरू असलेले स्टार्टअप हे देशात अव्वल ठरले आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कृषी उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु असलेलं महाराष्ट्रातील स्टार्टअप हे देशात अव्वल ठरले आहे. महाराष्ट्राची नोंदणीसाठी देशात 18 टक्के तर यशस्वी स्टार्टअप मध्ये राज्यातून एकूण 23 टक्के योगदान दिले आहे. येथे1 लाख 54 हजार 441 हुन अधिक रोजगार उपलब्ध झाले आहे.

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे स्टार्टअप बाबत मोठी जनजागृती होत आहे. आत्ता पर्यंत च्या केंद्रसरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडे राज्यातील मान्यताप्राप्त 16 हजार 145 स्टार्टअपची नोंद झाली असून देशातील यशस्वी 108 स्टार्टअप पैकी 25 स्टार्टअप हे महाराष्ट्र राज्यातील आहे. एवढेच नाही तर पहिल्या रँकचा राजीव गांधी एक्सलन्स अवॉर्ड 2021-22, निती आयोगाकडून नॅशनल इनोव्हेशन इंडेक्सचा चौथ्या रँकचा पुरस्कारही राज्‍याला मिळाला आहे.
हा स्टार्टअप इंडिया उपक्रम 16 जानेवारी 2016 रोजी देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टमध्ये नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आला. 
 
 Edited by - Priya Dixit