शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (10:12 IST)

महाविकास आघाडीच ब्लॅक फंगस, भाजपचं प्रत्युत्तर

कोरोना संकट काळात आता देशात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंगस असल्याची टीका केली.
 
पुण्यात एका कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावेळी संजय राऊत यांनी ही टीका केली. कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलंय. मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, असं राऊत म्हणाले.
त्याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला आहे.
 
बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही लाड यांनी राऊतांना दिला आहे. मुंबई महापालिकेत 2 हजार 200 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम शिवसेना करत असल्याची टीकाही राऊत यांनी केलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही लाड यांनी केला आहे.