शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (08:37 IST)

डोक्यावरून खूपच पाणी गेल्यानं घेतला निर्णय - मनिषा कायंदें

Press conference by Manisha Kayande
मनिषा कायंदे यांनी काल ठाकरे गटाला राम राम करत शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर चर्चेला उधानं आलं आहे. पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कायंदे यांच्यावर निशाणा साधला. बाईंना फार घाई होती. आल्याही घाईत आणि गेल्याही घाईत असं राऊत म्हणाले. दरम्यान, आज मनिषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.
 
पत्रकार परिषदेत बोलताना कायंदे म्हणाल्या की, मविआची स्थापना मनापासून पटली नव्हती.  ठाकरेंची बाजू नेहमीच मनापासून मांडली.2012 मध्ये मी बाळासाहेबांच्या सेनेत प्रवेश केला. अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. मी सेनेतच आहे. पक्षप्रवेश नाही. कारण मूळ विचारधारा दिवसेंदिवस बिघडत चाललीय. शिवसेना आणि भाजपाची विचारधारा सम-समान आहे.मी भाजपासोडून सेनेत आले तेव्हा माझी विचारधारा तीच राहिली.

दोन्ही पक्ष कट्टर आहेत. मात्र महाविकास आघाडी झाल्यानंतर काही विचार जुन्या शिवसैनिकांना पटले नाहीत.मलाही मविआची स्थापना मनापासून पटली नव्हती.मविआची विचारधारा पूर्णपणे वेगळी, तरी साथ दिली.पक्षाचा बचाव मनापासून करता येत नव्हता.डोक्यावरून खूपच पाणी गेल्यानं हा निर्णय घेतल्याचे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी सांगितलं.
 
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शिवसेना -भाजप विचारधारा एकच आहे. मात्र ठाकरेंनी विचारसरणीशी फारकत घेतली ते पटलं नाही.माझी मूळ विचारसरणी हिंदुत्वाचीच आहे.विचारसरणीपासून ठाकरे गट दूर गेला आहे.ठाकरे गटात मनमोकळेपणानं बोलणं शक्य नसतं.उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत राहून वैचारिक घुसमठ होत होती. मनातल्या गोष्टी बोलता येत नव्हत्या. जबाबदारी मिळत नव्हती.या सर्वांना कंटाळून एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केलं.


Edited By - Ratnadeep Ranshoor