शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 मे 2017 (20:31 IST)

खुशखबर : राज्यात २ ते ३ जूनलाच मोसमी पाऊस

३० ते ३१ मे पर्यंत मॉन्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मॉन्सून केरळमध्ये पोहोचल्यास महाराष्ट्रात २ ते ३ जूनलाच मोसमी पावसाची सुरूवात होण्याची शक्यता आहे.सर्वसाधारणपणे जून महिन्यात मॉन्सून राज्यात पोहोचतो. यंदा तो लवकरच पोहोचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. राज्यात यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून जून आणि जुलै महिन्यात पाऊस चांगला पडणार आहे. शेतकऱ्यांनी ६५ मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरण्या कराव्यात असा सल्ला कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.यंदा कमी दिवसात जास्त पाऊस तर काही काळ पावसात खंड पडण्याची शक्यताही डॉ. साबळे यांनी वर्तविली असली, तरी शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम चांगला असल्याचेही त्यांनी सांगितले.