मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शहीद संदीप जाधव अनंतात विलीन

martyr sandeep jadhav
जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर  केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यतं शोकाकूल वातावरणात त्यांना अखेराचा निरोप दिला जातो आहे. शहीद जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येने गावकरी हजर आहेत. संदीप जाधव अमर रहे, अशा घोषणा गावकऱ्यांकडून दिल्या जात आहेत. तसंच पाकिस्तानने केलेल्या कृत्याचा निषेध केला जातो आहे.  विशेष म्हणजे आज, शनिवारी संदीपच्या मुलाचा पहिलाच वाढदिवस आहे.

दुर्दैवाने मुलाच्या वाढदिवसाच्याच दिवशी पित्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. दुसरीकडे कोल्हापूरचे शहीद जवान श्रावण माने यांच्या पार्थिवावरही आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.