मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 एप्रिल 2023 (16:24 IST)

ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्क आणि सिने वंडर मॉलमध्ये भीषण आग, काही गाड्यांचे स्फोट

Orion Business Park on Ghodbunder Road
महाराष्ट्रातील ठाण्यातील कापूरबावडी येथील घोडबंदर रोडवरील ओरियन बिझनेस पार्क आणि सिने वंडर मॉलमध्ये मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली.अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आल्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीत काहीजण अडकण्याची शक्यता वर्तवली जात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे पार्किंग झोनमध्ये काही गाड्यांचा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.
 
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले की, आग रात्री 8.30 च्या सुमारास लागली आणि जवळच्या मॉलमध्ये पसरली. सध्या पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या अधिका-यांसह अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ओरियन पार्क ही इमारत सिने वंडर मॉलजवळ आहे, जिथे आग लागली. त्यात 60 हून अधिक दुकाने आणि कार्यालये असल्याचे सांगण्यात येत... 

अविनाश सावंत यांनी सांगितले की, अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. तसेच या घटनेत कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
 
अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आल्याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीत काहीजण अडकण्याची शक्यता वर्तवली जात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


Edited By- Priya Dixit