1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (16:52 IST)

जिजाबाई यांचा ‘पत्नी’म्हणून उल्लेख, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

Jijabai wife
११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दाखवण्यात आली आहे. यात शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा उल्लेख ‘पत्नी’ म्हणून करण्यात आला आहे. यातून महाराजांची बदनामी करण्याचा हा कट जाणीवपूर्वक केला जातो आहे का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.
 
संस्कृत सारिका हे लातूरच्या निकिता पब्लिकेशनचे पुस्तक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिले आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या मातेचा उल्लेख पत्नी म्हणून कसा केला? इतिहासाचा विपर्यास करण्यासाठी हा जाणीवपूर्वक करण्यात आलेला खोडसाळपणा आहे असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
 
संस्कृत सारिका हे वादग्रस्त पुस्तक त्वरित रद्द करावे. संबंधित पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या सगळ्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी लेखक, वितरक, प्रकाशकव अभियानाचे प्रमुख यांच्यावर महापुरुषांची बदनामी प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.