बुधवार, 17 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 30 मे 2019 (10:15 IST)

लाखो रुपयांचा नेकलेसच्या प्रेमात पडल्याने वधूची मैत्रीण तुरुंगात पोहोचली

Millions of rupees
महिला वर्गाला सोने चांदीच्या दागिन्याचे आकर्षण असते, मात्र हे आकर्षण गुन्हा करायला देखिल भाग पाडते, अशी घटना घडली आहे मुंबई येथे. वांद्रे येथील एका फाईव स्टार हॉटेलमधून नववधूच्या मैत्रिणीने ७ लाख किंमतीचा हार चोरीला होता. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनीलग्नात आलेल्या मेघा पंजाबी या महिलेला पकडले आहे. ती एका खासगी कंपनीत नोकरी करते.
 
लग्नाची तयारी जोमात सुरू असताना नवरीने तिचा हार मैत्रिणीला उत्सुकतेने दाखवला आणि पुन्हा बॅगेत ठेवला. मात्र काही वेळाने नवरी मेकअप रूममध्ये गेली तेव्हा हा हार गायब असल्याचे लक्षात आले तिला धक्का बसला. या लाखो रुपयांच्या हार चा सगळीकडे शोध सुरू केला. मात्र हार सापडला नाही. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. अखेर, महिलेने वांद्रे पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
 
पोलिसांनी सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी केली. तर मेकअप रूममध्ये सीसीटीव्ही नसल्याने, आरोपीपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक होते. अखेर, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी मंगळवारी मेघा पंजाबीला अटक केली, तर तिच्याकडून पोलिसांनी हार हस्तगत करण्यात आला आहे. हार पाहून तो तिच्या मनात भरला. त्यामुळे तिने तो चोरल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे मोहात न पडणे गरजेचे आहे नाही तर तुरंगाची हवा खावी लागते.