बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (09:14 IST)

मनसे पाकिस्तान विरोधात आक्रमक कलाकार, कपडे भारतात बंद

पाकिस्तानने भारतावर  दहशतवाडी  हल्ला केल्याचा विरोध देशभरात सुरु आहे सर्व ठिकाणी संताप होतो आहे. देशभरात शहिद जवांनाना श्रद्धांजली दिली जात आहे. याचबरोबर काही ठिकाणी पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची मागणी  केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(मनसे) पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली तर नंतर आता पाकिस्तानी ब्रँड असलेल्या कपड्यांवर मनसेने बहिष्कार घातला आहे. मॉल, कपडा विक्रेता, छोट्या मोठ्या दुकांदारांकडे मागणी केली आहे. मनसेने आपले निवेदन ई-मेल द्वारे या व्यापाऱ्यांना दिले. जर काही तासात  त्यांनी पाकिस्तानी ब्रँडच्या कपड्यांची विक्री थांबवली नाही तर खळ-खट्याक करण्याचा इशाराही मनसेने दिलाय,मनसेने केलेल्या निवेदनानंतर आता भारतात पाकिस्तानाच्या कपड्यांवर बहिष्कार टाकला  जाणार आहे..पाकिस्तानद्वारे केलेल्या हल्लयानंतर पाकिस्तानी कलाकारांचा विरोध मनसे द्वारे केला गेला, यासाठी मनसेने टी-सिरीजला पाकिस्तानी कलाकारांचे युट्यूबवरील व्हिडिओ डीलिट करण्यास सांगितले होते. मनसेने केलेल्या मागणीनंतर युट्यूबवरून ते व्हिडिओ काढण्यात आले आहेत.