शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मार्च 2023 (21:55 IST)

सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजे : राज ठाकरे

raj thackeray
सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजेत असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील पार्ल लोकमान्य टिळक संघाच्या २०२२-२३ च्या कार्यक्रमात  केले आहे.
 
राज ठाकरेंनी पार्ल लोकमान्य टिळक संघाच्या कार्यक्रमात म्हटले की, सध्याचे महाराष्ट्रामधील राजकारण बघितले तर असे वाटते की मी या राजकारणासाठी फीट नाही. कारण महाराष्ट्राची अशी परिस्थिती मी आजपर्यंत पाहिली नाही. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातील लोक ज्या प्रकारे सोशल मिडियाच वापर करतात, त्यावर व्यक्त होतात. हे पाहून असे वाटते की, सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी पैसे लावले पाहिजे. म्हणजे हे लोक गप्प बसतील.
 
राजकीय पक्षातील लोक काहीही बोलतात आणि टेलिव्हिजन चॅनेलवाले काहीही बातम्या दाखवतात. मी या विषयावर मागे अनेकदा बोललो आहे. मी चॅनेल पाहत नाही, पण सोशल मिडियावर जे रिल येतात त्यात राजकीय लोक वाट्टेल ते बोलतात. मला या सर्व गोष्टींचा विट यायला लागला आहे. महाराष्ट्रातील लोकांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण पाहिले आहे. पण आजचा महाराष्ट्र त्यांनी याआधी कधी पाहिला नसेल. ज्या महाराष्ट्राने देशाच प्रबोधन केल त्या महाराष्ट्राच प्रबोधन करावं लागत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor