बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (08:11 IST)

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका जाहीर

MPSC State Service Pre-Exam Final Answer Sheet Announced Maharashtra Regional News In Webdunia Marathi
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची अंतिम उत्तरतलिका जाहीर झालीय, राजपत्रित गट अ आणि गट ब च्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर झाली आहे, यावेळी देखील आयोगाकडून चक्क 8 प्रश्न रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींनी  नाराजी व्यक्त केली.
 
गेल्या वेळी PSI, STI च्या पूर्व परीक्षेत  आयोगाकडून चुकीची उत्तरे प्रसिध्द करण्यात आली होती. असा विद्यार्थ्यांचा आरोप होता, या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढाई लढली, असे असून देखील आयोगाकडून चुका वाढत जात आहे. 100 पैकी 8 प्रश्न रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होणार आहे असा आरोप विद्यार्थी करत आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार , गटविकास अधिकारी , कक्ष अधिकारी, अशा एकूण 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. माफक हीच अपेक्षा आयोगाने चुका कमी करून अचूक प्रश्न प्रश्पत्रिका तयार केली तर यावर मार्ग निघेल आणि रद्द करण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्ना साठी 1 गुण देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.