मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 एप्रिल 2018 (17:15 IST)

सार्वजनिक शौचालय खचले, दोघांचा मृत्यू

मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतील संपूर्ण  सार्वजनिक शौचालय खचले. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला आहे. ज्या ठिकाणी ही शौचालये होती तिथे मोठा खड्डा पडला आहे. सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली 2 महिला आणि 2 पुरुष अडकले होते. अखेर अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाच्या जवानांनी दोघांचे मतदेह बाहेर काढले आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.