रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (10:01 IST)

मुंबईत अतिरिक्त 5 हजार 625 कॅमेरे बसवणार

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत 1 हजार 510 ठिकाणी मिळून 4 हजार 717 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हा या प्रकल्प अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी शहरात अतिरिक्त 5 हजार 625 कॅमेरे बसविण्यास व त्यासाठी 323 कोटी 23 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 
मुंबई सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या करारातील तरतुदीनुसार मुंबई शहरात अतिरिक्त 5 हजार 625 कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईतील कॅमेर्‍यांची संख्या 10 हजार 342 इतकी होणार आहे. त्याच्या एकत्रित 1 हजार 303 कोटी 56 लाख रुपयांच्या प्रकल्प खर्चासही मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.